
टेंपोवरील चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू.
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवीहून जळावू लाकूड घेऊन रत्नागिरीकडे येणाऱ्या टेंपोला फणसवळे रस्त्यावर अपघात झाला. टेंपोवरील चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले.चारही जणांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गंभीर जखमी नेपाळी तरुणाला तपासून मृत घोषित केले. इतर तिघांवर उपचार सुरू आहेत. हरी थापा (वय २७, सध्या रा. जाकादेवी, मूळ नेपाळ) असे मृत नेपाळी तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १७) दुपारी तीनच्या सुमारास फणसवळे रस्त्यावर घडली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पोचालक परेश गणपत राऊत (वय ३०, रा. निवेंडी, ता. रत्नागिरी) हा टेंपो (एमएच ०८ एपी २६९२) घेऊन टेंपोत जळावू लाकूड भरून जाकादेवी ते रत्नागिरीकडे करबुडे मार्गे येत होते.
फणसवळे-शीळ रस्त्यावर परेश यांचा रस्त्याच्या उतारावर टेंपोवरील ताबा सुटला व टेंपो उलटला. रस्त्यातच टेंपो उलटल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला होता. यामुळे करबुडे येथून येणाऱ्या वाहनांना साईडपट्टीवरून मार्गक्रमण करावे लागत होते.या अपघातात टेंपोच्या हौद्यात बसलेले हरी थापा (वय २७), ललित रमते (२८) व राजेश छेत्री (२८, तिघेही रा. जाकादेवी, मूळ नेपाळ) हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच फणसवळे-शीळ रस्त्यावर ग्रामस्थांनी गर्दी केली. टेंपोतील लाकूड सामान बाजूला करून जखमींना तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या हरी थापा यांचा उपचार सुरू असताना मृत्यू ‘झाला