
आता पोस्टामार्फत माफक किमतीत रत्नागिरीचा हापूस आंबा आता सांगली येथील निवडक टपाल कार्यालयाच्या ठिकाणी उपलब्ध.
आता पोस्टामार्फत माफक किमतीत रत्नागिरीचा हापूस आंबा आता सांगली येथील निवडक टपाल कार्यालयाच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रवर डाक अधीक्षक बसवराज वालिकार यांनी दिली.वालिकार म्हणाले, भारतीय टपाल विभाग ग्राहकांचे हित जोपासण्याची महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याचबरोबर शेतकरी, लहान पुरवठादार, सामान्य उत्पादक, लहान उद्योजक आदींना मदत मदत आहे.त्यांची उत्पादने ग्राहकापर्यंत पोहोचवून त्यांच्या मालास योग्य भाव व बाजारपेठ मिळवून देण्यास प्रयत्नशील राहिलेला आहे.
याच भूमिकेतून रत्नागिरीचा हापूस आंबा सांगली निवडक टपाल कार्यालयाच्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे.शेतकरी ते थेट ग्राहक’ या संकल्पनेचा वापर पोस्टामार्फत केला जात असून कोकणातील नामवंत फळ उत्पादकाकडून नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला चांगला आंबा उपलब्ध करून देण्यात येत आहे. हा आंबा कोणत्याही रासायनिक पद्धतीचा वापरशिवाय पिकवलेला असणार आहे. त्यामुळे ग्राहकांना खात्रीशीर उत्पादन मिळण्यास मदत होणार असून त्यांना खऱ्या अर्थाने कोकणी मेवा उपभोगता येणार आहे. त्यामुळे कोकणचा अस्सल हापूस आंबा खायची नामी संधी आहे.ग्राहकांना अस्सल हापूस माफक दरात देण्यात येणार आहे.
दोन डझनच्या पेटीचा दर १ हजार २५० रुपये असेल. पेटी घरपोच हवी असल्यास अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे.पोस्ट कार्यालयात सुविधासांगली मुख्य पोस्ट, मिरज मुख्य पोस्ट, सांगली सिटी पोस्ट, विलिंग्डन कॉलेज पोस्ट ऑफिस, डिस्ट्रिक्ट कोर्ट सांगली पोस्ट ऑफिस, इस्लामपूर पोस्ट ऑफिस, शिराळा पोस्ट ऑफिस येथे नोंदणी करा.