
श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त २० ते २६ एप्रिलदरम्यान अखंड नाम, जप, यज्ञ सप्ताहाचे आयोजन.
रत्नागिरी : शहरातील नाचणे येथील श्री स्वामी समर्थ सेवा, सांस्कृतिक, अध्यात्मिक व बाल संस्कार केंद्राच्या वतीने (दिंडोरी प्रणित) २० ते २६ एप्रिल २०२५ या कालावधीत मामा गांधी कंपाऊंड, श्री स्वामी समर्थ, नाचणे रोड येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी अखंड नाम, जप, यज्ञ सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.
शनिवारी (१९ एप्रिल) ग्रामदेवता सन्मान, मंडल मांडणी,
रविवार (२० एप्रिल) मंडल स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवता हवन, नित्य स्वाहाकार,
२१ एप्रिल रोजी नित्यस्वाहाकार, गणेशयाग/मनोबोध याग,
२२ एप्रिल रोजी नित्यस्वाहाकार, चंडी याग,
२३ एप्रिल रोजी नित्यस्वाहाकार, श्री स्वामी याग,
२४ एप्रिल २०२५ नित्यस्वाहाकार, गीताई याग,
२५ एप्रिल नित्यस्वाहाकार, रुद्र याग/मल्हारी याग,
२६ एप्रिल रोजी नित्यस्वाहाकार, बलि पूर्णाहुती, श्री सत्यदत्त पूजन, देवता विसर्जन अखंड नाम-जप-यज्ञाने सप्ताह सांगता होईल.
दरम्यान या सप्ताह कालावधीत दररोज सकाळी ७.३० वाजता औदुंबर प्रदक्षिणा, सकाळी ८ वाजता भूपाळी आरती, ८.३० ते १०.३० या वेळेत माईकवरून सामूहिक श्री गुरुचरित्र वाचन, त्याचवेळी यज्ञमंडपात प्रातिनिधीक स्वरुपात सेवेकऱ्यांकडून नित्यस्वाहाकार. सकाळी १०.३० वाजता नैवेद्य आरती (सकाळच्या ३ आरत्या, मंत्रपुष्पांजली व प्रार्थना), सकाळी १०.३० ते १२.३० यावेळेत विशेषयाग, दुपारी १२.३० ते २ यावेळेत विश्रांती, दुपारी २ ते सायंकाळी ६ यावेळेत श्री स्वामी चरित्र सारामृत व श्री दुर्गा सप्तशती (प्राकृत) वाचन, १ आवर्तन रुद्राध्याय, ग्राम व नागरी अभियान अंतर्गत १८ विभागांचे मार्गदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी ६ ते ६.३० यावेळेत औदुंबर प्रदक्षिणा, सायंकाळी ६.३० वा. नैवेद्य आरती (संध्याकाळच्या सर्व आरत्या मंत्रपुष्पांजलीसह), ६.५० वाजता नित्यध्यान, गीताई, श्री मनाचे श्लोक, गीतेचा १५ वा अध्याय, श्री तुकारामाचा अभंग, पसायदान, श्री विष्णुसहस्त्रनाम वाचन,. श्री स्वामी समर्थ मंत्र जप एक माळ, असा दिनक्रम असेल.
दिनांक २६ एप्रिल रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. या वेळी आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांना स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा, सांस्कृतिक, अध्यात्मिक व बाल संस्कार केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.