
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे ०५ वे मरणोत्तर नेत्रदान व देहदान…
दिनांक – १७/०४/२०२५ रोजी श्री.वासुदेव बाळकृष्ण सप्रे वय – ८७ वर्ष. राहणार – मुरलीधर मंदिर आवार,बंदररोड, रत्नागिरी यांचे देहदान शासकिय वैद्यकिय महाविद्यालय रत्नागिरी येथे करण्यात आले.
दिनांक – १६/०४/२०२५ रोजी रात्री वृद्धापकाळाने श्री.वासुदेव सप्रे यांचे निधन झाले होते. श्री.वासुदेव सप्रे यांनी मरणोत्तर नेत्रदान व देहदान साठी संकल्प केला होता त्यानुसार श्री.हेमंत वासुदेव सप्रे ( मुलगा) व सौ.संपदा सुनील जायदे (मुलगी) यांनी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी येथे सप्रे यांचे नेत्रदान प्रकिया पूर्ण केली व शासकीय वैद्यकिय महाविद्यालय रत्नागिरी येथे विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी देहदान केले यावेळी समाजसेवक समीर करमरकर व विनायक शितुत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
श्री.वासुदेव बाळकृष्ण सप्रे यांचे देहदान दिनांक १७/०४/२०२५ रोजी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय रत्नागिरी येथे करण्यात आले.देहदानाच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय रत्नागिरी चे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ.योगिता कांबळे, डॉ.मंजुषा रावळ,शरीररचनाशास्त्र विभागातील कर्मचारी पूर्वा तोडणकर,भूमी पारकर, शिपाई मिहिर लोंढे तसेच वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी चे समाजसेवा अधिक्षक श्री.रेशम जाधव यांनी काम पाहिले.
श्री.वासुदेव बाळकृष्ण सप्रे यांचा अल्प परिचय := *रत्नागिरीतील प्रसिद्ध मुरलीधर मंदिराचे सुमारे ६० वर्ष पुजारी म्हणून कार्य केले*.*रत्नागिरीतील रा.भा.शिर्के प्रशाला व गोदूताई जांभेकर विद्यालय येथे लिपिक म्हणून सेवा दिली आहे*.