
राजापूर तालुक्यात दहावी प्रथम येणार्या विद्यार्थ्याला बक्षीस जाहीर, वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांची घोषणा.
इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत तालुक्यात प्रथम येणार्या विद्यार्थी किंवा विद्यार्थीनींना पाच हजार रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात येणार असल्याची घोषणा पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघाचे सल्लागार वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांनी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी केली.राजापूर तालुक्यात प्रथम येणार्या विद्यार्थी किंवा विद्यार्थीनीला पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून सन्मानित केले जाणार आहे. तालुका दुर्गभ असून पुरेशा सेवा सुविधा उपलब्ध नसताना देखील मुले दैदीप्यमान कामगिरी करत आहेत. या मुलांचे कौतुक व्हावे म्हणून प्रातिनिधीक स्वरूपात प्रथम येणार्या विद्यार्थी किंवा विद्यार्थीनींचा गुणगौरव व्हावा अशी त्यांची इच्छा आहे.www.konkantoday.com