
रत्नागिरी शहरानजीकच्या खेडशी-भंडारवाडी येथील घराच्या रुममध्ये वेल्डिंग चे सामान चोरट्याने लांबविले.
रत्नागिरी शहरानजीकच्या खेडशी-भंडारवाडी येथील घराच्या रुममध्ये पत्र्याच्या पेटीला कूलुप न लावता ठेवलेले १२ हजार १०० रुपयांचे सामान इलेक्ट्रीक वेल्डींग, इलेक्ट्रीक मशीन अज्ञात चोरट्याने पळविली. ग्रामीण पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २६ ते २७ जून २०२४ या कालावधित खेडशी-भंडारवाडी येथे घडली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी चेतन चंद्रकांत भुवड (वय ३२) यांनी खेडशी-भंडारवाडी येथे इलेक्ट्रीक वेल्डींगचे काम सुरु होते. त्या ठिकाणच्या घराच्या रुममध्ये पत्र्याच्या पेटीला कुलुप न लावता इलेक्ट्रीक मशीनसह सामान ठेवले होते. त्यामध्ये ५ हजाराचा वेल्डींग मशीन, १ हजार ५०० रुपयांचा इलेक्ट्रीक ग्रायंडर, १ हजाराचा ग्रायंडर, १ हजाराची इलेक्ट्रीक ड्रील मशीन, १ हजार ५०० रुपयांची रोटरी हॅमर ड्रिल मशीन, १ हजाराची वायर, १०० रुपयांचे दोन हातोडे, ६०० रुपयांची ड्रिल मशीनचे बीट, ४०० रुपयांची पेटी असा १२ हजार १०० रुपयांची मुद्देमाल चोरट्याने पळविला.