
रत्नागिरी जिल्ह्यातील २१ वी पशुगणना रेंगाळली.
जिल्ह्यात मार्चपर्यंत एकविसावी पशुगणना वेळेत पूर्ण न होताच रेंगाळली आहे. काही पशुंची चुकीची गणना करण्यात आल्याने या गणनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील पशुधनाच्या सर्व्हेक्षणानंतर राज्य, केंद्र शासनाकडे सर्व्हेक्षणाची आकडेवारी दिली जाणार आहे. शासनाच्या आदेशानंतर अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात येणार असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.
या पशुगणनेत गाढवं २१, हत्ती १, कुत्रे ६,७८८, घोडे ३६, खेचर १२, डुक्कर २७३, शिंगरू ११, ससे ४१, मेंढे ३२० अशी नोंद करण्यात आली. मात्र त्यांची फेरतपासणी करण्यात येणार आहे. एकविसावी पशुगणना २५ नोव्हेंबर २०२४ ते ३१ मार्च २०२५ अशी निश्चित करण्यात आली. मात्र विधानसभा निवडणुकीमुळे या गणनेला उशिरा सुरूवात झाली. ही पशुगणना मार्च अखेरपर्यंत पूर्ण झालेली नाही.www.konkantoday.com