
मुंबई कृषी उत्पन्न बाजारात हापूसच्या दरात घसरला.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीस येणार्या हापूस आंब्याचा दर आठवड्यापूर्वी ५० ते ६० हजार रुपये प्रति क्विंटल असा होता. आता तो घसरून ४० ते ५० हजार रुपये प्रति क्विंटल इतका झाला आहे. आगामी काळात तो आणखी कमी होईल, अशी शक्यता व्यापारी मंडळीने केली होती. १४ एप्रिल रोजी दिवसभरात कोकणातून १२ हजार ६३२ क्विंटल आंबा वाशी बाजारात दाखल झाला.www.konkantoday.com