डिजिटल माध्यमांचा उपयोग करत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेकडे झाले २७३ करोडचे व्यवहार. – ॲड. दीपक पटवर्धन.

सध्याच युग हे डिजिटल युग आहे. प्रामुख्याने आर्थिक क्षेत्रात तर डिजिटल क्रांती झाली आहे. अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म, साधन यामुळे आर्थिक व्यवहारांची गती वाढली आहे आणि ग्राहकांना ते सुविधाजनक होत आहे.

या डिजिटल युगापासून पतसंस्थांनाही फार दूर राहता येणार नाही. मात्र पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या पतसंस्था सभासद होऊ शकत नसल्याने थेट डिजिटल प्लॅटफॉर्म पतसंस्थांकडे उपलब्ध नाहीत. मात्र अन्य बँकांच्या सहकार्याने पतसंस्था ही आपल्या ग्राहकांना RTGS / NEFT सारख्या डिजिटल सेवा उपलब्ध करून देत आहेत. स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेकडे २०२४-२५ या आर्थिक वर्षात डिजिटल इनवर्डचे १२९३४ व्यवहार झाले तर आउटवर्डचे ६८८३ व्यवहार धरून १९ हजारांचे घरात डिजिटल व्यवहार झाले. संस्थेकडे १५३ कोटी ५४ लाखांचे इनवर्डचे व्यवहार झाले आणि ११० कोटी ३ लाखांचे आउटवर्ड व्यवहार असे २७३ कोटींचे व्यवहार डिजिटल माध्यमातून झाले आहेत. स्वरूपानंद पतसंस्थेने ग्राहकांच्या KYC योग्य पद्धतीने केलेल्या असून आयकर कायद्याचे पालन हे नेटक्या पद्धतीने केले असल्याने डिजिटल व्यवहार वाढत आहेत.

ग्राहक ठेव ठेवणे, ठेव काढणे, कर्ज रक्कम प्राप्त करणे, सोनेतारण कर्ज प्राप्त करणे, कर्जाचे हप्ते संस्थेकडे अदा करणे, आपल्या खात्यातून इतरत्र अमाउंट ट्रान्सफर करणे इत्यादी कामांसाठी RTGS / NEFT सुविधांचा वापर मोठ्या प्रमाणावर करू लागले आहेत. अशी माहिती संस्थेने अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली. डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणावर होतात ही संस्थेची विश्वासहार्यता आणि पारदर्शकता जनमानसामध्ये रूढ झाली असल्याचे दर्शवते असे ॲड. दीपक पटवर्धन म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button