
चिकन दुकानाच्या मॅनेजरने मालकाचा विश्वासघात करून दुकानातील सुमारे ९ लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार.
मंडणगड येथील म्हाप्रळ फाटा येथे असलेल्या एका चिकन दुकानाच्या मॅनेजरने मालकाचा विश्वासघात करून दुकानातील सुमारे ९ लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी १६ एप्रिल रोजी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्ताफ नसरुद्दीन मुकादम (वय ३५, रा. म्हाप्रळ, ता. मंडणगड) यांच्या चिकन दुकानात महंमद शारोझ आलम मुसा कुरेशी (वय २७, रा. नेरूळ, नवी मुंबई) हा मागील सुमारे एक वर्षापासून मॅनेजर म्हणून काम करत होता.
फिर्यादी मुकादम यांनी कुरेशी याच्यावर विश्वास दाखवला होता.फिर्यादी अल्ताफ मुकादम हे काही कामानिमित्त राजस्थान येथे गेले होते. याच दरम्यान, आरोपी महंमद कुरेशी याने दुकानातील ९ लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. जेव्हा फिर्यादी परत आले, तेव्हा त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.याप्रकरणी अल्ताफ मुकादम यांनी तात्काळ मंडणगड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली