
उपअभियंत्याची तत्काळ बदली करा, टेरव सरपंचांची मागणी.
टेरव गावचा ब वर्ग पर्यटनस्थळात समावेश असल्यामुळे शासनाकडून ४ कोटी ७५ लाखांचा निधी प्राप्त झाला होता. परंतु उपअभियंता श्री. सरदेसाई यांनी ३१ कामांपैकी एकाही कामाचे अंदाजपत्रक न केल्याने मंजूर निधी परत गेला. त्यामुळे सरदेसाई यांची तत्काळ बदली करा, अशी मागणी टेरव सरपंच किशोर कदम यांनी केली. तर टेरव प्रादेशिक नळपाणी योजनेवरील न्यायालयाची स्थगिती उठल्यानंतर गतीने योजना पूर्ण केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले.मंगळवारी जिल्हाधिकारी यांच्या दालनात टेरव गावातील प्रलंबित विकास कामांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.www.konkantoday.com