
अखेर पोलिसांनी सागर कारंडेला फसवणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या
चला हवा येऊन द्या फेम’ सागर कारंडे काही दिवसांपूर्वी सायबर क्राईमचा शिकार झालेला.याप्रकरणात त्यानं पोलिसांत धाव घेतली होती. आता अखेर पोलिसांनी सागर कारंडेला फसवणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. अक्षयकुमार गोपलन असं सागर कारंडेची फसवणूक करणाऱ्या आरोपीचं नाव असून आरोपीला सायबर पोलिसांनी ठाण्यातून अटक केली आहे.
आरोपी सापडला, पैशांचं काय?
सागर कारंडेला एक लाईक करा आणि पैसे कमवा या स्किमला सागर कारंडे बळी पडला आणि 61 लाखांचा फटका बसलेला. त्यानंतर सागर कारंडेनं तात्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र वेगानं हलवत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली, त्यावेळी आरोपीने क्रिप्टो करन्सी खरेदी करून सागर कारंडेकडून उकळलेले सगळे पैसे खर्च केल्याचं समोर आलं आहे. तसेच, केवळ सागर कारंडेच नाहीतर आरोपीनं इतरही अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याची माहिती मिळाली आहे.