
चिपी-पुणे -चिपी अशी प्रवासी विमानसेवा सुरु होणार
चीपी- पुणे या रूटसाठी अखेर विमानतळ प्राधिकरण आणि संरक्षण मंत्रालय यांनी परवानगी दिली आहे. गणेश चतुर्थी पूर्वी ही विमानसेवा Fly 91 कंपनी तर्फे सुरु करण्यात येत आहे.सद्या प्रत्येक शनिवार आणि रविवारी चिपी-पुणे -चिपी अशी प्रवासी विमानसेवा सुरु करण्यात येत आहे. याबाबत पुणे विमानतळ येथे स्लॉट उपलब्ध करून मिळण्यासाठी अडचण येत होती. याबाबत खासदार नारायण राणे यांनी हवाई मंत्री आणि संरक्षण मंत्री यांना पत्र पाठवून लक्ष वेधले होते. या नंतर दोन दिवसांसाठी विमान सेवा सुरु करण्याचे आदेश देण्यात आले. या बाबतची माहिती आज माजी सभापती निलेश सामंत यांनी खा.नारायण राणे यांची भेट घेऊन दिली. तसेच त्यांचे आभार मानले. सदर विमानसेवा संपूर्ण आठवडाभर सुरुकरण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन ना. राणे यांनी दिले. यावेळी आमदार नितेश राणे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पाटकर आदी उपस्थित होते.