
भारतात पेट्रोल-डिझेल 22% स्वस्त व्हायला हवे होते ठाकरेंच्या सेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल.
पेट्रोल-डिझेल, आता तरी दिलासा द्या,” अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सत्ताधारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारकडे केली आहे.देशाचा कायापालट फक्त आपल्याच राजवटीत झाला, असा दावा पंतप्रधान मोदींपासून त्यांच्या भक्त मंडळींपर्यंत सर्वच करीत असतात. मात्र प्रत्यक्षात स्थिती कशी उलट आहे, हे रोज घडणाऱ्या घडामोडींवरून स्पष्ट होत असते.
दरवाढ आणि महागाईच्या नावाने बोंब ठोकत ही मंडळी 2014 मध्ये केंद्रात सत्तेत आली. तेव्हापासून सलग 11 वर्षे सत्ता असूनही ना महागाई कमी झाली, ना दरवाढ नियंत्रणात आली. किंबहुना, दरवाढ होऊ नये अशी इच्छाशक्तीच मोदी सरकारची नाही. ती असती तर पेट्रोल-डिझेलचे भाव शक्य तेव्हा कमी झालेले दिसले असते. मात्र हे सरकार पेट्रोल-डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या दरांबाबत ‘अळीमिळी गुपचिळी’ असेच धोरण सोयिस्करपणे अवलंबत आले आहे,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं पेट्रोल-डिझेलचे भाव जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींवर अवलंबून असतात, असे तर्कशास्त्र ही मंडळी सांगत असते.
साहजिकच हे दर जागतिक बाजारात कोसळतात तेव्हा पेट्रोल-डिझेलचे देशांतर्गत दर कमी व्हावेत अशी एक साधी अपेक्षा जनतेची असते, परंतु आजपर्यंत ती पूर्ण झालेली नाही. अशावेळी भारतीय पेट्रोलियम कंपन्यांची पाठराखण करणारे मोदी सरकार देशांतर्गत इंधन स्वस्त करण्यासाठी या कंपन्यांवर सक्ती करीत नाही,