
जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनेत एकमेव गुहागरचा ठेकेदार काळ्या यादीत.
राज्यातील १०७ ठेकेदारांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील एका ठेकेदाराचा काळ्या यादीत समावेश असून गुहागर तालुक्यातील सुमारे १२ पाणी योजनांची कामे संबंधित ठेकेदाराने घेतली होती. ही अपूर्ण राहिल्यामुळे त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात आल्याचे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. राज्यातील १०७ ठेकेदारांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील या एकमेव ठेकेदाराचा काळ्या यादीत समावेश आहे.
जलजीवन मिशन योजनेंतर्गत जिल्ह्यात १ हजार ४३२ पाणी योजना सुरु आहेत. त्यापैकी ४०० पाणी योजना १०० टक्के पूर्ण झाल्या आहेत. १५० योजना पूर्ण होण्याच्या मार्गावर असून ४३२ योजनांचे काम सुधारित करावे लागणार आहे. आतापर्यंत मुदतीत कामे पूर्ण न करणार्या ६७ ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून गुहागर तालुक्यातील जलजीवन पाणी योजनेची १२ कामे घेऊन ती अपूर्ण राहिल्याने संबंधितठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. शासनाकडून जिल्ह्यातील टंचाई कमी करण्यासाठी पाणी योजना राबवल्या जात असताना ठेकेदारांमुळे बर्याचशा योजना रखडल्या असून त्या बाबत जनतेमधून संताप व्यक्त होत आहे. गुहागर तालुक्यातील जलजीवनची सुमारे १२ कामे एकाच ठेकेदाराने घेतली होती. काही कामांना त्याने सुरुवातही केली होती. परंतु कालातरांने ती कामे अर्धवट ठेवण्यात आली. याबाबत जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून नोटीसही संबंधित ठेकेदाराला देण्यात आली होती. वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर त्या ठेकेदावर काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता.www.konkantoday.com