
चिपळुणात शहरातील मोठे नाले व पर्हे यांच कॉंक्रीटीकरण करण्याचा चिपळूण नगरपालिकेचा धोरणात्मक निर्णय.
आम्ही केवळ कागदावरच आपत्ती व्यवस्थापन आरागडा तयार केला नसून प्रत्यक्ष कृतीलाही सुरूवात केल्याचा दाखला चिपळूण नगर पालिकेसह प्रशासनाने देत आपल्या कामाची वेगळी चुणूक दाखवून दिली आहे. नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत नागरिकांच्या सूचनांचा गांभीर्याने विचार करत त्यादृष्टीने प्रांताधिकारी आकाश लिंगाडे, तहसिलदार प्रविण लोकरे, मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी दुसर्या दिवसापासून कार्यवाहीला सुरूवात केली आहे.
पावसाळ्यात शहरपरिसरातून पूर परिस्थिती उदभवू नये, अतिवृष्टी झाल्यास शहरवासियांना त्याचा मोठा फटका बसू नये, यासाठी पालिका प्रशासनाने शहरातील मोठे नाले व पर्हे यांच कॉंक्रीटीकरण करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यासाठी ४० कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. याशिवाय दोन महिन्यांपूर्वीच मान्सून पूर्व कामांतर्गत शहरातील नाले, पर्हे, गटारांची साफसफाई करताना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गटारांच्या स्वच्छतेची कामे देखील हाती घेतली आहेत.www.konkantoday.com