
भैरी मंदिर, जोगेश्वर मंदिर, नवलाई-पावणाई मंदिरात भाविकांना प्रवेशासाठी ड्रेसकोड लागू.
रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिरासह झाडगांव येथील जोगेश्वर मंदिर आणि तांबट आळी येथील नवलाई पावणाई मंदिरात भाविकांना पारंपारिक पोषाखातच प्रवेश देण्याचा निर्णय ट्रस्टीनी घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी हनुमान जयंती म्हणजेच शनिवार दि. १२ एप्रिलपासून करण्यात आली आहे.श्री देव भैरीवर बारावाड्यातील ग्रामस्थांसह राज्यातील भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिरात नित्यनेमाने दर्शनासाठी येणार्या भाविकांबरोबरच दूरदूरचे भाविकही दर्शनाला येतात.www.konkantoday.com