प्रभागातील समस्या बाबत जनता युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस प्रवीण देसाई यांनी दाखवली तत्परता

रत्नागिरी शहरातील स्टेट बॅंक कॉलनी येथे श्री. भोसले यांच्या निवासस्थानासमोर नव्याने पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली. परंतु पाण्याच्या दोन पाईपलाईनमुळे गटाराचा मार्ग बंद झाला आणि पाणी तुंबून श्री. भोसले यांच्या आवारात जाऊ लागले. ही समस्या भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस प्रवीण देसाई यांना कळताच तात्काळ देसाई यांनी नेमकी समस्या समजून घेऊन त्यावर तात्काळ कार्यवाही केली आणि प्रश्न सोडवला. याबद्दल परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले.
, शहरामध्ये सर्वत्र नवीन पाणीयोजनेसाठी पाईपलाईनचे काम सुरू आहे. स्टेट बॅंक कॉलनी येथेही अशा प्रकारे काम करण्यात आले, आलीमवाडी येथे टाकी बसवण्यात येणार असल्याने त्यासाठी आणखी एक मोठा पाईप या ठिकाणी वरच्या भागात बसवण्यात आला. त्यावेळी चक्क गटार फोडून मधून पाईप टाकण्यात आला, यामुळे पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद झाला व पाणी तुंबण्यास सुरवात झाली. तसेच हा भाग उताराचा असल्याने पावसामुळे वरच्या क्रांतीनगर या भागातील गटाराच्या चुकीच्या नियोजनामुळे कॉलनीत रस्त्यावर सुमारे फुटभर पाणी साचते.
तुंबलेले गटार आणि रस्त्यावरील पाणी शेजारीलच भोसले व अन्य लोकांच्या अंगणात, आवारात घुसू लागले. यामुळे त्यांची मोठी पंचाईत झाली. ही समस्या भाजयुमोचे शहर सरचिटणीस प्रवीण देसाई यांना सांगण्यात आली. त्यांनी तत्काळ हे काम करणाऱ्या ठेकेदार व नगरसेवक उमेश कुळकर्णी यांच्याशी संपर्क साधून कामास सुरुवात केली. प्रवीण देसाई स्वतः सकाळी जातीनिशी हजर होते. शक्य तो प्रयत्न करुन प्रभागातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न राहील असे मत यावेळी प्रवीण देसाई यांनी व्यक्त केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button