
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणार्या कुंभार्ली घाटात उपाययोजना सुरू.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा कुंभार्ली घाट सध्या वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. कुंभार्ली येथील माय-लेकांच्या अपघाती मृत्यूनंतर या घाटातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. या संदर्भात सर्वपक्षीय पुढार्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर धडक देत घाटात सुरक्षित वाहतुकीसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती.
याची गंभीर दखल घेत बांधकाम विभागाने पहिल्या टप्प्यात घाटात संरक्षक कठडे उभारणीला सुरूवात केली आहे. तर उर्वरित कामे देखील लवकरच हाती घ्यावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भरत लब्धे यांनी केली आहे.पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली घाट महत्वाचा मार्ग म्हणून ओळखला जातो. कुंभार्ली घाट नागमोडी वळणाचा आहे. या घाटात मालवाहू ट्रक बंद पडल्यानंतर वाहतूककोंडी होते.www.konkantoday.com