कागलचे माजी आमदार संजय घाटगे आणि गोकुळचे संचालक अंबरिष घाटगे आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार


कागलचे माजी आमदार संजय घाटगे आणि गोकुळचे संचालक अंबरिष घाटगे मंगळवारी मुंबई येथे दुपारी तीन वाजता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील व प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा प्रवेश होणार आहे.भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांची उपस्थिती असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर दौर्‍यात संजय घाटगे यांना तुम्ही पक्षप्रवेश करा, आम्ही तुम्हाला ताकद देऊ, असे घाटगे यांना आश्वस्त केले होते. घाटगे पिता-पुत्रांच्या भाजप प्रवेशाने कागलमधील राजकारणात नवे ट्विस्ट निर्माण होणार आहेत. शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांची भाजप प्रवेशाची चर्चा असतानाच संजय घाटगे व अंबरिष घाटगे यांचे भाजपमध्ये प्रवेश करण्यात पुढचे पाऊल ठरले आहे. कारण, कागलच्या राजकारणामध्ये घाटगे पिता -पुत्रांची वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी जवळीक आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button