
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन ठेकेदाराने थकवल्याने राजापूर नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांचे बेमुदत संप.
राजापूर नगरपरिषदेच्या कंत्राटी पध्दतीने घेण्यात आलेल्या कर्मचार्यांचे वेतन VDKया ठेकेदार कंपनीने थकविल्याने व शासनाकडून दिलेल्या परीपत्रकात देण्यात आलेली कर्मचार्यांच्या वेतनाची रक्कम आणि ठेकेदार कंपनी कर्मचार्याना देत असलेल्या वेतनाची रक्कम यामध्ये खुप मोठी तफावत असल्याने सबंधीत ठेकेदार कपंनीच्या विरोधात कंत्राटी पध्दतीने नगर परिषदेमध्ये काम करणार्या कर्मचार्यांनी बेमुदत संप सुरु केला असून अशा आशयाचे पत्र न. प. प्रशासनामार्फत ठेकेदार कंपनीला दिले आहे. राजापुर नगरपरिषदेमध्ये VDK या ठेकेदार कंपनीच्या अंतर्गत सफाई कर्मचारी, बांधकाम कर्मचारी, व डाटा ऑपरेटर या पदावर काम करीत आहेत. परंतु या कर्मचार्यांना किमान वेतना प्रमाणे वेतन दिले जात नाही. तसेच किमान वेतनाच्या अर्ध्या पेक्षा कमी वेतन देण्यात येते. ते देखील कर्मचार्यांकडून कंपनीच्या सुपरवायझरला वारंवार फोन करुन वेतनाची मागणी करून देखील वेळेत मिळत नसल्याचे उपोषणाला बसलेल्या कर्मचार्यांनी सांगितले.
एका कर्मचार्याला सर्व भत्ते मिळून २२ ते २३ हजारा पर्यंत किमान वेतन दिले जात असून प्रत्यक्षात मात्र अर्ध्याहून कमी वेतन कंपनी कडून कर्मचार्यांना दिले जात असल्याचे उपोषणकर्त्या कर्मचार्यांनी सांगितले.तसेच नगरपरिषद प्रशासनाकडून अधीक माहिती घेतली असता कंत्राटी कर्मचार्यांच्या हजेरी पटावर ४८ कर्मचारी असून प्रत्यक्षात मात्र ३९ कर्मचारी राजापूर नगरपरिषदेमध्ये कार्यरत असून उर्वरीत कर्मचारी आहेत कुठे? की ठेकेदार कंपनीकडून त्या कर्मचार्यांच्या नावावर शासनाकडून पैसे उकळले जात आहेत की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.शासनाकडून जर सर्व भत्त्यासहीत एवढी रक्कम कर्मचार्यांच्या वेतनापोटी कंपनीला दिली जात असेल तर संबधीत ठेकेदार कंपनी अर्ध्याहून कमी वेतन देवून कंत्राटी कर्मचार्यांची फसवणूक करत आहे असे बोलले जात आहे. यामुळे या कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली असून बँके
चे हप्ते व इतर कोणाकडुन उसणे घेतलेले पैसे त्यांना व्याजासहीत परतफेड करणे कठीण झाले असून न.प. च्या कंत्राटी कर्मचार्यांनी VDK या ठेकेदार कंपनीच्या विरोधात दि. १५ एप्रिल पासुन बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे.