
चिपळूण वैश्य समाज आणि ब्लड लाईन ग्रुप चिपळूण यांचेतर्फे रविवारी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन
कोरोना संकटाच्या काळात आपल्या समाजसेवेचे कर्तव्य पार पाडत चिपळूणातील असंख्य नागरिकांना आपल्या सेवेतून सहकार्य करण्याचे व्रत अंगी घेतलेल्या चिपळूण वैश्य समाज, चिपळूण*आणि *ब्लड लाईन ग्रुप, चिपळूण या दोन सामाजिक संस्थांनी आजची काळाची मोठ्या प्रमाणात लागणारी रक्ताची गरज ओळखून एका भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.
आजच्या ह्या संकटसमयी कोरोना रुग्णांना तसेच इतरही रुग्णांना रक्ताची आवश्यकता पडत आहे. कोरोना आल्यामुळे ही गरज वाढली आहे. परिणामी रक्तपेढ्यांमध्ये असलेला रक्ताचा साठा कमी पडत आहे. अशा वेळेस रक्त पुरवठा कमी पडू नये व आवश्यक त्या रुग्णांना वेळीच रक्त पुरवठा होऊन ते सुखरूप बरे व्हावेत ह्या सामाजिक भावनेने चिपळूणमधील दोन सामाजिक संस्थानी एकत्रित एक भव्य असे रक्तादान शिबीर घेण्याचे आयोजन केले आहे.
*चिपळूण वैश्य समाज, चिपळूण आणि *ब्लड लाईन ग्रुप, चिपळूण या सामाजिक संस्थांनी *रविवार दिनांक ११ जुलै २०२१ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत *राधाताई लाड सभागृह, वैश्य भवन, खेंड, चिपळूण येथे रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. तरी रक्तदान, श्रेष्ठदान या सद्भावनेने ह्या समाजोपयोगी उपक्रमात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा आणि आपल्या गरजू चिपळूण वासीयांसाठी आपला मदतीचा हात द्यावा असे आवाहन दोन्ही संघटनांनी केले आहे.
www.konkantoday.com