
मालवण येथे मुंबई विद्यापीठाचे किल्ला अध्ययन केंद्र उभारणार-मंत्री आशिष शेलार.
शिवछत्रपतीच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या किल्ले सिंधुदुर्ग, पद्मगड, राजकोट आणि सर्जेकोट किल्ल्यांचा इतिहास शिवप्रेमींसमोर यावा, यासाठी मुंबई विद्यापीठाशी संलग्न असे अध्ययन केंद्र मालवणात उभारले जाईल.यासाठी पहिल्या टप्प्यात 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि आवश्यकता भासल्यास आणखीनही निधीची तरतूद करू, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केली.किल्ले सिंधुदुर्गच्या उभारणीला 358 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यावतीने पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृह याठिकाणी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यावतीने किल्ले सिंधुदुर्ग महोत्सव मामा वरेरकर नाट्यगृह येथे किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती यांच्या समन्वयातून आयोजित करण्यात आला होता. तसेच ‘महाराणी ताराराणी’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी ना. शेलार बोलत होते.तत्पूर्वी ना. शेलार यांनी किल्ले सिंधुदुर्ग येथे जात शिवराजेश्वर मंदिरात दर्शन घेतले. पालकमंत्री नीतेश राणे, आ. नीलेश राणे, सिंधुदुर्ग बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजप नेते प्रमोद जठार, जिल्हाधिकारी अनिल पाटील, अति. पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहराध्यक्ष बाबा मोंडकर, जिफ. प. माजी अध्यक्ष अशोक सावंत, सांस्कृतिक कार्य संचालनालयचे संदीप बलखंडे आदी उपस्थित होते