
मायक्रो फायनान्सच्या जाचाविरोधात संघटित लढा उभारा -हुसेन दलवाई.
मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून अव्वाच्या सव्वा व्याज आकारले जात असल्याच्या अनेक तक्रारी पुढे येत आहेत. गोरगरीब व सर्वसामान्य कुुटुंबे त्याला बळी पडत आहेत. कर्ज वसुलीसाठी या कंपन्यांची दादागिरीही वाढू लागली आहे. कर्जदार महिलांनाही अपशब्द वापरण्याच्या घटना घडत आहेत. हे प्रकार वेळीच थांबायला हवेत. केंद्र आणि राज्य सरकारला तुमच्या अडचणी, समस्या, तुमचे प्रश्न यांचे काहीच देणेघेणे नाही. त्यांचे कुचकामी धोरणच अशा प्रकारांना खतपाणी घालत असल्याने गोरगरीब कुटुंबे कर्जात डुबत चालली आहेत. त्यामुळे मायक्रो फायनान्सच्या या जाचाविरोधात आता महिलांनी संघटित होवून लढा उभारायला हवा, असे सांगतानाच या लढ्यात मी आणि माझा पक्ष तुमच्यासोबत असल्याची ग्वाही माजी खासदार हुसेन दलवाई यांनी दिली. या वेळी कोणत्याही फायनान्स कंपनीचे अतिरिक्त व्याज न भरण्याचा एकमुखी निर्धार उपस्थित महिलांनी केला.www.konkantoday.com