
ब्रिटीशकालीन धरण परिसरात सध्या गंभीर प्रदूषणाचा प्रश्न, कारवाईस विलंब, राजकीय हस्तक्षेपाचा संशय.
बोरज गावातील ब्रिटीशकालीन धरण परिसरात सध्या गंभीर प्रदूषणाचा प्रश्न उभा राहिला असून स्थानिक नागरिकांच्या सततच्या तक्रारीनंतरही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पातळीवरून दबावतंत्र वापरले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
प्रदूषण करणार्या उद्योगांच्या मागे स्थानिक राजकीय म्होरक्यांचा हात असल्याची जोरदार चर्चा आहे. राजकीय आश्रयामुळेच संबंधित व्यक्तींवर कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे. एका व्यक्तीला वाचविण्यासाठी संपूर्ण परिसरातील हजारो नाकरिकांच्या आरोग्याची खेळ केला जात असल्याचे चित्र आहे.www.konkantoday.com