
दापोली शहराचा विस्तार पाहता अग्निशमन केंद्र उभारण्याची दापोलीवासियांची मागणी.
दापोली शहराचा विस्तार पाहता येथे फायर फायटर वाहनाची गरज आहे. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दापोली नगरपंचायतीत सध्या ही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे दापोली शहरात एखादा अनुचित प्रकार घडला तर यंत्रणेला रामभरोसेच रहावे लागणार आहे.दापोली नगरपंचायतीमधील अग्निशमन बंब जुना झाल्याने निर्लेक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे दापोली नगरपंचायतीला अग्निशमनासाठी खेडच्या फायर फायटरवर अवलंबून रहावे लागते.
तालुक्यात एखादी दुर्घटना घडल्यास खेडहून अग्निशमन वाहन येईपर्यंत वाट पहावी लागते. मात्र अग्निशमन वाहन घटनास्थळापर्यंत पोहोचेपर्यंत खूप नुकसान होते. दापोलीसाठी फायर स्टेशन मंजूर आहे. फायर स्टेशनसाठी लागणारी जागा आरक्षित असून ती जागा नगरपंचायतीच्या नावावर वर्गही झाली आहे. मात्र, निधीअभावी आजपर्यंत फायर स्टेशनच्या कामाला सुरूवातच झालेली नाही, हे दुर्दैव आहे.www.konkantoday.com