
ग्रामीण रुग्णालय पाली येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान व एच.एल.एल यांच्या संयुक्त विद्यमाने महाडायलिसिस सेंटर चा लोकार्पण सोहळा.
ग्रामीण रुग्णालय पाली येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान व एच.एल.एल यांच्या संयुक्त विद्यमाने महाडायलिसिस सेंटर चा लोकार्पण सोहळा मा.ना.उदयजी सामंत मंत्री उद्योग व मराठी भाषा महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा.यांचे वडील मा.रविंद्रजी (अण्णा ) सामंत यांच्या शुभहस्ते पार पडला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भास्करजी जगताप यांनी भूषविले,डायलिसिस लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भास्करजी जगताप सर व मा.वैद्यकिय अधीक्षक डॉ.विकास कुमरे सर यांनी सर्व मान्यवरांची स्वागत केले व डॉ.विकास कुमरे सर यांनी प्रास्ताविक करून ग्रामीण रुग्णालय पाली या रूग्णालयाच्या उल्लेखनिय बाबी व डायलिसिस या आजारा विषयी सखोल विवेचन केले.
या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी प्रमुख मान्यवर मा.श्री.रविंद्रजी (अण्णा) सामंत यांनी डायलिसिस विभागाला शुभेच्छा दिल्या व चांगल्या पद्धतीने रुग्णांची सेवा करण्यासंदर्भात सूचना दिल्या. त्याबरोबर अध्यक्षीय भाषणात मा.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भास्करजी जगताप यांनी डायलिसिसचे महत्व काय आहे व रुग्णाला डायलिसिस का करावे लागते, आपल्या दैनंदिन आयुष्यातील ज्या वाईट गोष्टींमुळे आपल्या शरीरातील अवयवांवर दुष्परिणाम होतो त्या सर्व गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत या पद्धतीचे मार्गदर्शन डॉ.भास्करजी जगताप सर यांनी केले.
या डायलेसिस लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले प्रमुख मान्यवर मा.श्री.रविंद्रजी (अण्णा) सामंत . मा.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्करजी जगताप सर,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक तथा वैद्यकिय अधीक्षक डॉ.विकास कुमरे सर,मूत्रपिंडविकार डॉ.अमय बेडेकर,डॉ.विनोद कानगुले,वैद्यकिय अधिकारी डॉ.सचिन साळुंखे,त्याच बरोबर या कार्यक्रमाला RDCC बँकेचे संचालक श्री.रामभाऊ गराटे ,श्री.सचिन (तात्या)सावंत, श्री.संदिप गराटे, श्री.प्रकाश परपते,श्री.गुरुनाथ(बाबा)गराकटे , एच.एल.एल जिल्हा समन्वयक श्री.दुर्वेश खाके व डायलिसिस विभागाचे तंत्रज्ञ व कर्मचारी वर्ग पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरीक व डायलिसिसचे रुग्ण, त्यांचे नातेवाईक,त्याबरोबर ग्रामीण रुग्णालय पालीचे अधिकारी व कर्मचारी वर्ग या महाडायलिसिस च्या लोकार्पण सोहळ्यासाठी बहुसंख्येने उपस्थित होते.