एसटी बसच्या तिकिटावर साफसफाई कराचा भार लादण्याचा प्रस्ताव वाहतूक विभागाने सादर केला.

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱयांच्या अर्ध्या पगाराला कात्री लावणारे महायुती सरकार पुन्हा एकदा प्रवाशांच्या खिशावर डल्ला मारण्याच्या तयारीत आहे.एसटी बसच्या तिकिटावर साफसफाई कराचा भार लादण्याचा प्रस्ताव वाहतूक विभागाने सादर केला आहे. हा प्रस्ताव महामंडळाचे नवे अध्यक्ष, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या टेबलावर ठेवल्याचे समजते. त्याला औपचारिक मंजुरी मिळताच ‘लालपरी’चा प्रवास आणखी महागणार आहे. लाडक्या नेत्याचे ‘लाड’ पुरवण्यासाठी सरकारने हा लुटमारीचा नवा घाट घातल्याची चर्चा आहे.एसटी महामंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच 86 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या पगाराला कात्री लावण्यात आली. त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले. कोरोना काळातही पगारकपात झाली नव्हती, मात्र महायुती सरकारला निवडणूक काळात घोषणा केलेल्या सवलतींच्या खैरातीचे व्यवस्थापन न जमल्याने एसटी कर्मचाऱयांच्या अर्ध्या पगाराला कात्री लावली.

यातून कर्मचाऱयांना मोठा मनस्ताप दिलेल्या महायुतीने आता एसटी प्रवाशांच्या खिशावर पुन्हा डल्ला मारण्याची तयारी सुरू केली आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी एसटी महामंडळ अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. त्याआधी सनदी अधिकारी संजय सेठी हे अध्यक्ष होते. सेठी यांच्या कार्यकाळात एसटीच्या अनेक महत्त्वाच्या फाईल्स मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. या फाईल्स आता प्रताप सरनाईक यांच्या टेबलावर ठेवल्या आहेत. याच फाईल्समध्ये एसटीच्या तिकिटावर साफसफाई कराचा भार लादण्याचा प्रस्ताव असल्याचे सूत्रांकडून समजते.एसटी बसगाडय़ा, बस स्थानक, आसपासचा परिसर, मध्यवर्ती तसेच विभागीय कार्यालये, वरिष्ठ अधिकाऱयांच्या केबिन्स आदींची साफसफाई करणे तसेच बसगाडय़ांची धुलाई करणे ही कामे करण्यासाठी एसटी महामंडळाकडून साफसफाईचे कंत्राट लाडक्या नेत्याच्या कंपनीला देण्याचा घाट सरकारने घातला आहे. या कंत्राटाचा खर्च प्रवाशांच्या खिशातून उभा केला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button