
जीवसृष्टीची माहिती व्हावी यासाठी दापोली कृषी विद्यापीठाचा निसर्ग सफारीचा उपक्रम
रत्नागिरी ः जीवसृष्टीची माहिती पर्यटकांना व नागरिकांना व्हावी यासाठी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या वन शास्त्र महाविद्यालयाने निसर्ग सफारी हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करून इको टुरिझमची संकल्पना मांडली आहे.
या उपक्रमात विद्यापीठाच्या ५० हेक्टर क्षेत्रात असणार्या जागेत हा उपक्र्रम राबविण्यात येणार असून त्यामध्ये चरक उद्यान, नक्षत्र वन, वूड नर्सरी, बांबू प्रकल्प आदींबरोबर विविध प्रकारचे पक्षी, फुलपाखरे आदींची माहिती विद्यार्थी पर्यटकांना व नागरिकांना पुरवणार आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेला हा उपक्रम राबवणारे दापोली कृषी विद्यापीठ हे पहिलेच विद्यापीठ आहे.
www.konkantoday.com