
संगमेश्वर तालुक्यातील मासरंग परिसरात वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या हेतूने फिरणाऱ्या आठ जणांना सिंगल बॅरल बंदूक व अन्य साहित्यासह पोलिसांनी ताब्यात घेतले.
संगमेश्वर तालुक्यातील मासरंग परिसरात वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या हेतूने फिरणाऱ्या आठ जणांना सिंगल बॅरल बंदूक, जिवंत काडतूस व इतर मुद्देमाल व चारचाकी वाहन सहित संगमेश्वर पोलिसांनी ताब्यात घेण्याची धडाकेबाज कामगिरी केली असून ही कामगिरी मासरंग -शेनवडे रस्त्यावर १२ एप्रिल रोजी २ वाजता करण्यात आली. वन्य प्राण्यांची शिकार करणारेच पोलिसांच्या सापळ्यात सापडल्याने तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक प्रशांत शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर,पोलीस हेडकॉन्स्टेबल सिद्देश आंब्रे, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ अव्हाड, होमगार्ड मोहिते हे पोलीस वाहनाने रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना तालुक्यातील मासरंग -शेनवडे रस्त्यावर MH 08/E/0950 नंबर असलेल्या महिंद्रा पिकअप बोलेरो चारचाकी वाहनातून दशरथ दिलिप बारगोडे वय 39 राहणार पोमेंडी बुद्रुक, कारवांचीवाडी,जि. रत्नागिरी विजय भिकाजीं पाछकुडे वय 42 राहणार शेनवडे ता. संगमेश्वर, सुभाष दाजी बोबळे वय 50 राहणार शेनवडे, चिलेवाडी ता. संगमेश्वर,गणेश गंगाराम लाखन वय 32 राहणार शेनवडे, खालचीवाडी ता. संगमेश्वर, सत्यवान सिताराम जोगळे वय 38 राहणार शेनवडे ता. संगमेश्वर,रमेश सिताराम लाखन वय 43 वय राहणार शेनवडे खालचीवाडी ता. संगमेश्वर, सुरेश मोळू जोगळे वय 38 राहणार शेनवडे जोगळेवाडी ता. संगमेश्वर दिलिप रामचंद्र बारगोडे पोमेंडी बुद्रुक कारवांची वाडी हे आठ जण वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने दिलिप रामचंद्र बारगोडे यांच्या नावे शेती संरक्षण परवाना असलेली सिंगल बॅरल बंदूक काडतूस बंदूक, शक्तिमान 12 एक्सप्रेस नं दीडशे रुपये किमतीचा एक काडतूस, शक्तिमान 12 एक्सप्रेस 4.8 सहाशे रुपये किमतीचे चार काडतूस आणि विजेऱ्या सहा बॅटऱ्या स्वतःजवळ बाळगून वावरताना आढळून आल्याने संगमेश्वर पोलिसांनी वापरण्यात आलेली पिकअप बोलेरो, बंदूक असा एकूण 2,57,250 रुपयांच्या मुद्देमाला सहित या आठजणांना ताब्यात घेतले आहे.