
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीची आत्महत्या, त्याची हत्या झाल्याचा कुटुंबाचा आरोप
कल्याणमध्ये १३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळी याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विशाल गवळी याला नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते.
कल्याणमध्ये १३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळी याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विशाल गवळी याला नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते.त्याने रविवारी पहाटे चार ते पाचच्या दरम्यान तुरुंगातील शौचालयात जाऊन गळफास लावून घेतला, असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आता गवळी याच्या कुटुंबीयांनी विशालची हत्या केल्याचा आरोप केला आहे.
विशाल गवळीच्या कुटुंबीयांनी प्रशासनावर मोठा आरोप केला आहे. विशालची हत्या करण्यात आली आहे. त्याला फसवले आहे, असा आरोप त्याच्या आई वडिलांनी केला आहे. विशालच्या आीने सांगितले की, मला सकाळी सात वाजता पोलिसांनी फोन केला. यावेळी त्यांनी मला विशालने आत्महत्या केली असं सांगितलं. माझा मुलगा कधी आत्महत्या करणारच नाही. तो नेहमी आत्महत्या करणे पाप आहे म्हणायचा. हे राजकारण झालं आहे. पोलिसांना पैसे देऊन हे सगळं केलं आहे, असा गंभीर आरोप विशालच्या आईने केला.