
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे येत्या ४ मे रोजी रत्नागिरी शहरात तालुकास्तरीय किड्स सायक्लोथॉनचे आयोजन.
रत्नागिरी येथील रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे येत्या ४ मे रोजी रत्नागिरी शहरात तालुकास्तरीय किड्स सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.मुलांनी मोबाईलवर गेम खेळण्याऐवजी सुट्टीचा आनंद लुटावा, याकरिता सायकल चालवावी आणि तंदुरुस्त राहावे या उद्देशाने सायक्लोथॉन आयोजित केली आहे.सुवर्णसूर्य फाउंडेशनने या स्पर्धेसाठी छोटे अंतराळवीर चालवणार सायकल अशी संकल्पना मांडली आहे. या उपक्रमामधून खगोल विज्ञानाविषयी भरीव माहिती मिळून शालेय विद्यार्थ्यांच्या मनात एक कुतूहल तयार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महावीर जयंतीला ही स्पर्धा जाहिर झाली असून हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्त ही संकल्पना जाहीर करण्यात आली आहे.
आतापर्यंत विविध शाळांमधील जवळपास १०० हून जास्त विद्यार्थ्यांनी म्हणजेच छोट्या अंतराळवीरांनी सायकल चालवण्यासाठी नोंदणी केली आहे. यामध्ये वयवर्षे ६ ते १० साठी ५ किमी व वय वर्ष ११ ते १५ करिता १० किमी अंतर ठेवण्यात आले आहे. प्रथम नोंदणी करणाऱ्या २०० स्पर्धकांना टी शर्ट मिळणार आहे. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना आकर्षक मेडल, ई-प्रमाणपत्र तसेच सुरस फूड्स- द फूड कल्चरच्या माध्यमातून नाश्ता देण्यात येणार आहे.