
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त जय भीम पदयात्रा.
रत्नागिरी, दि.13 :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त आज सकाळी 7.30 वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअम येथून जयभीम पदयात्रा काढण्यात आली. उपशिक्षणाधिकारी नरेंद्र घावंड यांनी या जयभीम पदयात्रेला हिरवा झेंडा दाखविला.

सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार यावेळी अर्पण करण्यात आला. त्यानंतर या पदयात्रेस सुरुवात झाली. ही पदयात्रा मारुती मंदिर चौकात आली. येथे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन आणि पुष्पहार अर्पण करुन ही पदयात्रा शासकीय रुग्णालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आली.
पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. स्काऊट शिक्षक प्रशांत जाधव यांनी यावेळी संविधान उद्दिशेकेचे वाचन केले. त्यानंतर या पदयात्रेचा समारोप झाला.
या पदयात्रेत क्रीडा अधिकारी गणेश जगताप, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक मोहित सैनी यांच्यासह गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे एन.सी.सी. चे विद्यार्थी, रा.भा. शिर्के हायस्कूलचे एन.सी.सी स्काऊट विद्यार्थी, एस.पी.हेगशेट्ये महाविद्यालाचे एन.सी.सी, एन.एस.एस चे विद्यार्थी तसेच पटवर्धन हायस्कूलचे एन.सी.सी.चे विद्यार्थी शिक्षक-शिक्षका, माय भारत व्हॉलेंटिअर मधील विद्यार्थी सहभागी झाले होते._
क्लिक