
मुंबई गोवा महामार्गावर निवळी येथील अतिक्रमणे हटवणार.
मुंबई गोवा महामार्गावर निवळी येथील ८०० मीटरच्या टप्प्यात उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली असून या कामाला ग्रामस्थांनी विरोध केला. यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल की रुंदीकरण होणार हा निर्णय पुन्हा लांबणीवर पडला आहे. मात्र येथील सर्व्हिस रोडसाठी तारवेवाडी, रावणंगणवाडीतील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम ९ एप्रिल रोजी हातात घेण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग प्राधिकरणाया सूत्रांनी दिली.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी येथील ८ मीटर या टप्याचे काम रखडले आहे.
सर्व्हिस रोडसाठी भूसंपादित करण्यात आलेल्या जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे, परवान्याविना बांधण्यात आलेली बांधकामे आहेत. ही बांधकामे, तात्काळ स्वखर्चाने हटवावी, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने करण्यात आले आहे. अन्यथा ९ एप्रिल रोजी पोलीस बंदोबस्तात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने अतिक्रमण हटवण्यात येतील असा इशारा देण्यात आला आहे.www.konkantoday.com