
रत्नागिरी जिल्हा पोलीस दला मार्फत “अमली पदार्थ” विरोधी कारवाई.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दला मार्फत, वर्ष 2024 मध्ये अमली पदार्थ संदर्भात एकूण 25 गुन्हे दाखल करण्यात आलेले होते ज्या मध्ये एकूण 39 आरोपींना अटक करण्यात आली तसेच त्यांच्या ताब्यातून खालील नमूद अमली पदार्थ जप्त करण्यात आला.
अ क्र अमली पदार्थ वजन अमली पदार्थ किंमत
1) 231 ग्रॅम ब्राऊन हेरोईन रुपये 715650 /-
2) 32.858 किलो ग्रॅम गांजा रुपये 6,66,054 /-
3) 12.720 किलो ग्रॅम चरस रुपये 50,89,600 /-
एकूण रुपये 64,71,304 /-
वर्ष 2025 मध्ये एकूण 06 गुन्हे दाखल करण्यात आलेले होते ज्या मध्ये एकूण 11 आरोपींना अटक करण्यात आली तसेच त्यांच्या ताब्यातून खालील नमूद अमली पदार्थ जप्त करण्यात आला.
अ क्र अमली पदार्थ वजन अमली पदार्थ किंमत
1) 25.4 ग्रॅम ब्राऊन हेरोईन रुपये 2,26,250 /-
2) 7.616 किलो ग्रॅम गांजा रुपये 3,76,197 /-एकूण रुपये 602447 /-
रत्नागिरी जिल्हा पोलीस दला मार्फत एकूण 07 सराईत इसमांना हद्दपारी करण्यात आलेली आहे तसेच एकूण 19 हद्दपारी प्रस्ताव मंजूरी करिता पाठविण्यात आलेले आहेत.