
जिल्हाधिकारी कार्यालया समोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा एकाचा प्रयत्न
शासनाच्या कारभाराला कंटाळून एका इसमाने आज रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला हा प्रकार लक्षात येताच आजूबाजूच्या लोकांनी त्याला प्रकारापासून परावृत्त केले त्याच्याजवळ न फोडलेली विषाची बाटली असल्याचे कळते आपणाला शासनाकडून न्याय मिळत नसल्याचे तो म्हणत आहे या प्रकारामुळे खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांनी गर्दी केली आह याबाबत पोलिसांना खबर देण्यात आली असून पोलिस घटनास्थळी आले आहेत सदरच्या इसमाचे नाव सुर्वे असल्याचे व तो गवळीवाडा येथील असल्याचे कळते त्याने हा प्रकार करण्यामागचे कारण अद्याप कळू शकलेले नाही
www.konkantoday.com