
खेड दापोली मार्गावरती रिक्षेचा अपघात,मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर मदतीला धावले
खेड – दापोली रोड वर आज एका रिक्षाचा अपघात झाला. खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या प्रसंगावधान दाखवल्याने अपघातग्रस्तांना तत्काळ उपचार मिळू शकले आज दुपारी बाराच्या सुमारास खेड वरून दापोली येथे जाणा-या एका रिक्षेचा सुर्वे इंजिनिअरींग येथे अपघात झाला. या अपघाता रिक्षामध्ये असलेले २ माहिला, २ लहान मुली , १ पुरूष आणि चालक जखमी झाले. खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आणि मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी तत्काळ घटना स्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना स्वतःच्या गाडीतून भरणे येथील राॅयल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. वैभव खेडेकर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे तत्काळ उपचार मिळालेwww.konkantoday.com