
खेडमध्ये ३५ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण.
खेड ः खेड पालिका हद्दीत भटक्या कुत्र्यांचा वाढलेला वावर रोखण्यासाठी येथील पालिकेने निर्बिजीकरणाची मोहीम हाती घेतली. तीन दिवसांत ३५ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले. आतापर्यंत १४१ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आल्याची माहिती पालिकेचे स्वच्छता निरीक्षक विनायक सावंत यांनी दिली. ही मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती पालिकेने दिली