
रामदेव स्वामींचे परमशिष्य डॉ. परमार्थ देव यांचा १२ पासून जिल्हा दौरा.
पतंजली योग समितीचे परमपूज्य रामदेव स्वामींचे परमशिष्य, संस्थांचे केंद्रीय मुख्य प्रभारी डॉ. परमार्थ देव ११ ते १५ एप्रिल या कालावधीमध्ये रत्नागिरी जिल्ह्याला भेट देणार आहेत. तसेच विविध ठिकाणी आयोजित योग शिबिरे व कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये योग, आयुर्वेद आणि सनातन भारतीय संस्कृतीचा प्रचार, प्रसार करण्यासाठी आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी स्वामी रामदेव महाराज तसेच आचार्य बाळकृष्ण महाराज यांनी अहर्निश प्रयत्न केले आहेत.
त्याचा एक भाग म्हणून परमार्थ देव रत्नागिरी जिल्ह्याला भेट देणार आहेत.१२ एप्रिल रोजी दापोली येथे नवभारत छात्रालयामध्ये पहाटे ५.३० ते ७ या वेळेमध्ये योग शिबिरामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. १३ ते १५ एप्रिल असे तीन दिवस रोज सकाळी ६ ते ८ या वेळेमध्ये रत्नागिरी शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे मार्गदर्शन करणार आहेत. १३ रोजी सकाळी ११ ते १ या वेळेमध्ये लांजा येथे कार्यकर्त्यांना व योग साधक संवाद साधणार आहेत.www.konkantoday.com