
रत्नागिरीत उद्या महाकुंभातील अनुभवांवर आधारित आचार्य मंगेश फडके यांचे व्याख्यान.
रत्नागिरी* :नुकत्याच झालेला महाकुंभमेळा व त्यातील अनुभव या विषयावर आचार्य मंगेश फडके यांचे व्याख्यान स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाने (पावस) आयोजित केले आहे. उद्या दि. १२ एप्रिलला सायंकाळी ६ ते ८ या वेळेत वरची आळी येथील अध्यात्म मंदिरात हे दृक-श्राव्य माध्यमातील व्याख्यान होणार आहे.महाकुंभाची पर्वणी साधणे सर्वांनाच शक्य झाले नाही. त्यामुळे या विशेष व्याख्यानाचे आयोजन केले आहे. श्री. फडके हे वेदांत भास्कर अमेरिकेतील परमार्थिक संस्थेचे संस्थापक आहेत. सद्गुरू प.पू. श्रीकृष्ण द. देशमुख उपाख्य डॉ. काका कृपांकित शिष्य आहेत.
महाकुंभमेळ्यामध्ये ते सुद्धा सहभागी झाले होते. त्यांनी कुंभमेळ्याची पर्वणी साधली. त्यावरच ते व्याख्यान देणार आहेत. त्यांचे शिक्षण बीई (कॉम्प्युटर सायन्स, एमबीए) झाले असून गेले २८ वर्षे नोकरीनिमित्त कॅलिफोर्निया, अमेरिका येथे वास्तव्यास आहेत. सद्गुरुंच्या कार्यासाठी वयाच्या ५० व्या वर्षी सेवानिवृत्ती घेतली आहे. मराठी, हिंदी व इंग्लिश भाषेत वेदांत व संत साहित्याचा प्रसार व प्रचार, विविध विषयांवर ते दीर्घ प्रवचने देतात. तसेच आनंदाचे तत्वज्ञान, विवेक चुडामणि, अथर्वशीर्ष, श्रीज्ञानेश्वरी, श्रीनारद भक्तिसूत्रे आदी अनेक पारमार्थिक विषयावर प्रवचने देतात.