
मंडणगड तालुक्यातील सडे मानेवाडी येथे कोयता मानेवर ठेवून जबरी चोरी.
मंडणगड तालुक्यातील सडे मानेवाडी येथे गुरुवारी (दि. १० एप्रिल) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी . तोंडाला रुमाल बांधलेल्या तीन अज्ञात इसमांनी घरात घुसून एका ६५ वर्षीय वृद्धाला बांधून त्याच्याकडील रोख रक्कम आणि सोन्याची चैन असा एकूण २ लाख ९१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.याबाबत नंदकिशोर परशराम माने (वय ६५, रा. सडे मानेवाडी) यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
.पोलिसांनी अज्ञात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी नंदकिशोर माने हे ९ एप्रिल रोजी रात्री १० वाजता जेवण करून आपल्या बेडरूममध्ये झोपले होते. १० एप्रिल रोजी मध्यरात्री २ ते २.३० च्या दरम्यान त्यांना किचनच्या स्लाइडिंग खिडकी सरकवण्याचा आवाज आला. ते उठण्याचा प्रयत्न करत असतानाच तोंडाला रुमाल बांधलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी घरात प्रवेश केला. त्यांनी माने यांना पकडून त्यांचे हात-पाय टॉवेलने बांधले आणि घरातील कोयता त्यांच्या मानेवर ठेवून ओरडल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.त्यानंतर या चोरट्यांनी माने यांच्या तोंडावर चादर टाकली आणि बेडच्या बाजूला असलेले कपाट उघडून त्यातील २० हजार रुपये रोख आणि प्लास्टिकच्या पिशवीतील ३५ हजार रुपये रोख तसेच उशाखाली ठेवलेली सुमारे ४ तोळे वजनाची सोन्याची चैन (अंदाजे किंमत २ लाख ३६ हजार रुपये) जबरदस्तीने चोरून नेली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे