
उदयजी सामंत ह्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचा 65 वा वर्धापनदिन सोहळा.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचा 65 वा वर्धापनदिन सोहळा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.माझ्या राजकीय कारकिर्दीची यशस्वी सुरुवात 2000 साली खादी ग्रामोद्योग मंडळामुळेच झाली. तसेच मी माझ्या मतदारसंघात निवडून आल्यानंतर मतदारसंघातील विद्यार्थ्यांच्यासोबत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली खादी यात्रा काढली होती. पुढे त्याची दखल तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम साहेब यांनी घेतली होती आणि त्यावेळी माझी व कलाम साहेब यांची पुणे येथील राजभवन येथे खादी यात्रेबाबत प्रदीर्घ चर्चा झाली होती या आठवणी यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितल्या.
खादी ग्रामोद्योग मंडळाला भविष्यात लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा निर्माण करून दिल्या जातील, तसेच या मंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला विविध प्रकारचे उद्योग व्यवसाय उभे करून दिले पाहिजे यासाठी तात्काळ आराखडा तयार करण्याच्या सूचना मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी संबंधितांना दिल्या व त्यावर तातडीने अंमलबजावणी करण्याचे यावेळी आश्वासन देखील मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी दिले.या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्रजी साठे, मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर, राजकुमारजी डोंगरे, स्मिताताई खरात, नित्यानंदजी खरात, खादी व ग्रामोद्योग मंडळाचे आजी माजी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.