हृदय व फुफ्फुसांचे पुनरुज्जीवन (CPR) : एक आवश्यक जीवनरक्षक कौशल्य.

सिपीआर प्रशिक्षण ही काळाची गरज आहे व सी पी आर कसा द्यायचा व कुणाला द्यायचा याअनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भास्कर जगताप,अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेंद्र गावडे , जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार कुंभार,रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ वसीम सय्यद,सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सीपीआर प्रशिक्षण आयोजित केले जात आहे. याकामी विभागीय स्तरावरून प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केद्र, कोल्हापूर चे डॉ योगेश साळे ,उप प्राचार्य डॉ विनीत फाळके यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

यामध्ये जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण अंतर्गत सर्व जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी यांचे प्रशिक्षण झाले आहे. तसेच पुढील टप्प्यात तालुकास्तरावर ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होणार आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सर्व आशा कार्यकर्ती ,अंगणवाडी सेविका यांचे प्रशिक्षण होणार आहे.त्याचप्रमाणे महाविद्यालयीन स्तरावर सर्व विद्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे तसेच ग्रामस्तरावर ग्रामसभेद्वारे गावातील सर्व नागरिकांचे प्रशिक्षण हे जून २०२५ या कालावधी पर्यँत टप्याटप्याने आयोजित केले जाणार आहे.

काय आहे – हृदय व फुफ्फुसांचे पुनरुज्जीवन (CPR) एक आवश्यक जीवनरक्षक कौशल्य प्रशिक्षण हृदय व फुफ्फुसांचे पुनरुज्जीवन (CPR) हे एक अत्यावश्यक जीवनरक्षक कौशल्य आहे, जे अचानक हृदयविकार (Cardiac Arrest) किंवा श्वासोच्छ्वास थांबल्यास एखाद्या व्यक्तीचे जीवन वाचवू शकते.बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव आणि अयोग्य आहार यामुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत, सिपीआर( CPR) चे महत्त्व अनमोल आहे. अचानक हृदयविकार झाल्यास, वेळेवर सिपिआर केल्यास व्यक्तीचे जीवन वाचण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.आरोग्य सेवा सुविधांमध्ये सुधारणा होत असली, तरी आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय मदत मिळण्यास विलंब होऊ शकतो. अशा परिस्थितीत, सिपिआर चे ज्ञान आणि कौशल्य सामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. त्यामुळे, प्रत्येक नागरिकाने सीपीआर (CPR) चे महत्त्व जाणून घेणे आणि त्याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत ते एखाद्याचे जीवन वाचवू शकतील.

 आवश्यकता :

हृदय व फुफ्फुसांच्या पुनरुज्जीवनाचे (CPR) महत्त्व आणि गरज हृदय व फुफ्फुसांचे पुनरुज्जीवन (CPR) हे एक अत्यंत महत्त्वाचे जीवनरक्षक कौशल्य आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे हृदय अचानक थांबते किंवा श्वास घेणे बंद होते, तेव्हा CPR हे त्या व्यक्तीला वाचवण्याची संधी देते.

 महत्त्वः जीवन वाचवतेः

CPR रक्ताभिसरण आणि ऑक्सिजनचा प्रवाह पुन्हा सुरू करून मेंदू आणि इतर महत्त्वाच्या अवयवांना होणारे नुकसान टाळण्यास मदत करते.

 मेंदूचे नुकसान टाळतेः हृदयाचे ठोके थांबल्यानंतर काही मिनिटांतच मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो, ज्यामुळे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते. त्वरित CPR केल्याने हे नुकसान कमी करता येते.

 रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी मदतः रुग्णवाहिका येईपर्यंत CPR केल्याने रुग्णाला वाचण्याची शक्यता वाढते.

 सामुदायिक प्रतिसादः CPR चे ज्ञान समाजात पसरल्यास, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळू शकते.यामध्ये अर्भकापासून ते मोठया व्यक्तीला सिपीआर ची गरज पडते व तो कसा द्यायचा,याबाबत सर्वांना प्रशिक्षित केले जाणार आहे. सीपीआर ची गरज केव्हा पडते : अचानक हृदयविकार, बुडणे, गुदमरल्यामुळे, विजेचा धक्का, औषधांचा अतिवापर“सीपीआर चे घेऊ प्रशिक्षण ,करूया प्राणांचे रक्षण”

सर्वांनी सीपीआर चे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.जेणेकरून वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वी आपत्कालीन परिस्थितीत आपण एखाद्याचे जीवन वाचवू शकतो. (डॉ.अनिरुद्ध आठल्ये),जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button