
संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी उंब्रटवाडीत बेकायदेशीर दारूधंद्यावर छापा.
संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी उंब्रटवाडी येथील राजेंद्र सुर्वे (५४) यांच्या राहत्या घरी सायंकाळी संगमेश्वर पोलिसांनी छापा मारून १२ हजार ३३३५ रुपयांचा देशी विदेशी कंपनीचा मद्यसाठा जप्त केला. ही कारवाई रविवार दि. ६ रोजी करण्यात आली.
कुंभारखाणी उंब्रटवाडी येथे विनापरवाना देशी विदेशी दारू विक्री होत असल्याची माहिती संगमेश्वर पोलिसांना मिळाली असता संगमेश्वर पोलिसांनी एका घरावर छापा मारला. त्यावेळी राजेंद्र सुर्वे हा आपल्या राहत्या घराच्या पडवीमध्ये देशी, विदेशी दारूची विक्री करताना आढळला. संगमेश्वर पोलिसांनी पंचांसमक्ष सर्व मुद्देमाल जप्त केला.www.konkantoday.com