
रत्नागिरीला पाणीपुरवठ्यासाठी ६ फ्लोटिंग पंपांचा आधार
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सुधारित पाणी योजनेमध्ये शीळ धरण ते जॅकवेलपर्यंत सुमारे साडेसहाशे मीटरची पाईपलाईन टाकण्याचे काम गेले वर्षभर सुरू आहे. गेल्या पावसाळ्यापूर्वी पाईपलाईन टाकण्याचे काम अर्धवट झाले होते. सुमारे ५४ लाखाचे हे काम होते. आता दुसरा पावसाळा जवळ येऊनही हे काम रखडल्याने त्यावर पर्याय म्हणून तयार करण्यात आलेल्या फ्लोटिंग पंपांद्वारेच शहराला पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
शीळ धरण ते जॅकवेलपर्यंतची साडेसहाशे मीटरची पाईपलाईन टाकण्यास ठेकेदाराकडून दिरंगाई झाल्याचा फटका नगर परिषद प्रशासनाला सहन करावा लागत आहे. गतवर्षी शीळ जॅकवेल कोसळल्यामुळे शहरातील पाणीप्रश्न निर्माण झाला होता. त्यावर तात्पुरता पर्याय म्हणून त्या जॅकवेलजवळच्या नदीपात्रात फ्लोटिंग पंप बसविण्यात आले आहेत. त्या पंपाद्वारे पाण्याची उचल केली जात आहे. www.konkantoday.com