
मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच,मुंबईकडून पोलादपूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर टेम्पोची दुचाकीला धडक , एकाचा मृत्यू तीन जण जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच, आहे
बुधवारी रात्री लोहारमाळ गावाजवळ मुंबईकडून पोलादपूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीला धडक दिली.या अपघातात दुचाकीवरून निघालेल्या पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पत्नीसह दोन मुले गंभीर जखमी आहेत.
याप्रकरणी टेम्पो चालक अतुल अजित कातवणकर (वय- 35) रा. मिठबाग, ता. देवगड जि. सिधुदुर्ग) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास गणेश महादेव येरुणकर, (वय 41, रा. ताबंडभुवन, पोलादपूर) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार येरुणकर यांचा भाचा सुनिल सुरेश पवार हा अॅक्टीव्हा गाडी (एम एच 06 सी जी 4955) वरुन पत्नी व दोन मुलांसह लोहारमाळ ते पोलादपुर मुबई गोवा हायवेने पोलादपूर दिशेला जात होता. त्याचवेळी पाठिमागुन आलेल्या आयशर टेम्पोने (एम.मच. 07 ओ.जे 2210) धडक दिली. या अपघात सुनिल पवार त्याची पत्नी सुवर्णा पवार (वय-३९) मुलगा श्लोक पवार (वय-१३) आणि रिया पवार (वय-१०) सर्व रा.ताबंडभुवन पोलादपुर, जखमी झाले. त्यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढे हलविण्यात आले. सुनील याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सुनीता व दोन मुलांना मुंबई येथील एम जी एम ला हलविण्यात आले आहे.