
बोर्डाची वेबसाईट सायबर सुरक्षित करा, मंत्री आशिष शेलार यांच्या सूचना.
मुंबई : दहावी, बारावी बोर्डाच्या वेबसाईटची क्षमता वाढवणे व सायबर सुरक्षित करण्याबाबत येत्या सात दिवसात अहवाल सादर करा, असे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री ऍड. आशिष शेलार यांनी दिले.दहावी, बारावी निकालाच्या तारखेला विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून वेबसाईट बाबत आढावा घेण्यासाठी आज बोर्डाचे अधिकारी आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अधिकार्यांची संयुक्त बैठक मंत्री ऍङ आशिष शेलार यांनी घेतली. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन, माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक अनिल भंडारी, सचिव सदाम आंधळे या बैठकीला उपस्थित होते.www.konkantoday.com