पुणे येथे झालेल्या इनोव्हेशन कॉम्पिटीशन डिपेक्स स्पर्धेत मंडणगड आयआयटीचा सोलर कल्टीव्हेटर राज्यात दुसरा.

पुणे येथे झालेल्या इनोव्हेशन कॉम्पिटीशन डिपेक्स या राज्यस्तरीय तंत्रशोध स्पर्धेत मंडणगड शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने राज्यात दुसरा क्रमांक मिळवला. राज्यभरातून आलेल्या ४५४ स्पर्धकांमधून या प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सोलर ऑपरेटर कल्टीव्हेटर या प्रोजेक्ट मॉडेलने बाजी मारत द्वितीय क्रमांक पटकावल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासह विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सीओईपीमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत राज्यातून सुमारे ४५४ स्पर्धक सहभागी झाले होते. आयआयटी ते आयटीआय अशा वेगवेगळ्या शिक्षणस्तरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. जिल्हास्तरावर यश मिळवलेला मंडणगड शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने सोलर ऑपरेटर कल्टीव्हेटर हे प्रोजेक्ट मॉडेल या स्पर्धेमध्ये सादर केले होते. सर्वोत्कृष्ट सादरीकरण व ग्रीन एनर्जी बस प्रोजेक्ट हे या प्रकल्पाचे आकर्षण ठरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकल्पाची दखल घेवून प्रकल्पाबाबत स्टॉलवर भेट देवून माहिती घेतली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button