
परत गेलेला निधी मिळविण्यासाठी पुरातत्व विभागाची धडपड
रत्नागिरीतील पुरातत्व विभागाला संग्रहालय (म्युझियम) आणि इतर कामांसाठी आलेले ६ कोटी रुपयांचा प्राप्त निधी मार्च अखेर बीडीएस यंत्रणा बंद झाल्यामुळे शासनाकडे परत गेला. तांत्रिक गोष्टीमुळे परत गेलेले हे पैसे पुन्हा मिळावे, यासाठी पुरातत्व विभागाकडून आता हालचाली सुरू झाल्या आहेत.शासकीय कार्यालयाचे देणे व अनुदान वाटपाची अखेर ३१ मार्चला झाली. त्या त्या विभागाच्या बिडीएस प्रणालीद्वारे शासकीय अनुदान दिले जाते.
पुरातत्व विभागाला देखील वास्तु संग्रहालयाच्या नवीन दालनासाठी सुमारे साडे चार कोटी आणि इतर कामांचे मिळून ६ कोटी रुपये येणार होते. पण मार्च अखेर बिडीएस प्रणाली ११ वाजता बंद झाली आणि ११ वाजून १० मिनिटाने शासनाकडून निधी आला. बिडीएस यंत्रणा बंद झाल्यामुळे शासनाचा हा निधी संबंधित विभागाकडे न जाता परत गेल्याने वेळेचा तांत्रिक फटका पुरातत्व विभागाला बसला आहे. एमएसआरडीच्या माध्यमातून हे काम होणार आहे. त्यांना हा निधी वर्ग केला जाणार होता. जिल्ह्यातील राज्य संरक्षित असलेल्या गड किल्ल्यांच्या दुरूस्तीसाठी १५ कोटींची मागणी शासनाकडे केली आहे.www.konkantoday.com