
नवनिर्माणचे फिजिओथेरपीत अभूतपुर्व योगदान : असि.चॅरिटी कमिशनर श्रीमती. सय्यद
जागतिक आरोग्य दिनी गुडघेदुखी आणि संधिवातावर फिजिओथेरपी शिबिर संपन्न.
रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्थेने रत्नागिरी येथे फिजिओथेरपी पदवी महाविद्यालय सुरु करत आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात अभूतपुर्व योगदान दिले आहे. आजचा “नी पेन फिजिओथेरपी मोफत कॅम्प” हे या परिसरातील जनतेसाठी अत्यावश्यक सुविधा आहे. संस्थेच्या या उपक्रमाला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. असे प्रतिपादन कॅम्प उदघाटनप्रसंगी बोलतांना असि. चॅरिटी कमिशनर श्रीमती. सय्यद यांनी केले.
यावेळी रत्नागिरीच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिथय ज्येष्ठ डॅाक्टर रमेश चव्हाण, नवनिर्माण शिक्षण संस्था उपाध्यक्ष आणि परकार हॅास्पिटलचे निर्माते डॅा. अलिमियाँ परकार, आर्थोटीस्ट डॅा. राजेंद्र कशेळकर, सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पाथरे, संस्था अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये , संचालक सौ. सीमा हेगशेट्ये फिजीओ डायरेक्टर ऋतुजा हेगशेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये मान्यवरांचे स्वागत करताना रत्नागिरी परिसरातील वैद्यकीय क्षेत्राचा माहिती दिली. रत्नागिरीचे आरोग्य सुदृढ ठेवण्याचे काम मागील 55 वर्षे डॉ. रमेश चव्हाण तर डॉ. अलीमियॅा परकार 46 वर्षे करत आहेत. रत्नागिरीच्या सुदृढ आरोग्य आणि त्यातील मॅारेलीटी याचे ते पायोनियर आहेत. डॉक्टर कशेळकर कृत्रीम अवयव रोपण क्षेत्रात विशेष कार्य करत आहेत. हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण आणि सेवा बजावले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी बोलताना डॉक्टर अलिमियॅा परकार यांनी आपल्या मनोगतातून वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी सदैव ऍक्टिव राहिले पाहिजेत. आणि ज्यावेळी डॉक्टर होऊन बाहेर पडाल त्यावेळी निस्वार्थीपणे सेवा बजावली पाहिजे, असे मत व्यक्त केले. डॉ. चव्हाण यांनी नवनिर्माणचे फिजिओथेरपी महाविद्यालय तर्फे गुडघेदुखी मार्गदर्शन मोफत कॅम्पचे विशेष कौतुक केले. सध्यपरिस्थितीत यांची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले. . यावेळी मोठ्या संख्येने रुग्ण आले होते. काही रुग्ण व्हील चेअरवरुन आले होते. महाविद्यालयाचे प्राध्यापक डॅा. करन कारा, डॅा. अनघा शेळके-शिंदे, डॅा. अनया शिंदे, डॅा. महिमा सावंत यांनी रुग्ण तपासून त्यांना मार्गदर्शन केले. यांत महाविद्यालयाचे ४६ विद्यार्थी सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यासाठी हा अनुभव अत्यंत अनोखा आणि रत्ननगरिच्या या क्षेत्रातील गरजेची ओळख देणारा होता, तर गुडगेदुखीच्या रुग्णांना असे मार्गदर्शन आणि तेही मोफत आणि तज्ञाकडून हा विशेष आनंददायी अनुभव होता. यावेळी आर्थिक क्षमता नसणाऱ्या रुग्णांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला आणि असा कॅम्प किमान दोन महिन्यांनी घ्यावा, अशी मागणीही नोंदवली. या पुढील काळात एस. एम. जोशी फिजीओथेरपी महाविद्यालय ना नफा ना तोटा या तत्वावर ओपीडी सुरु करणार असल्याचे संचालक ऋतुजा हेगशेट्ये यांनी माध्यमाशी बोलतांना सांगितले. अनुष्का शिरसाठ या विद्यार्थीनीने कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.